दहिवडी जि.प. शाळेत मैत्री फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम.

 दहिवडी जि.प. शाळेत मैत्री फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

     स्वातंत्र्य दिनानिमित्त दहीवडी ता. तुळजापूर येथे आयोजित केलेल्या शालेय स्पर्धा परीक्षा 10 ऑगस्ट रोजी घेऊन त्याचे बक्षिस वितरण 15 ऑगस्ट 2018 रोजी मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पोपट भोसले, सचिव खंडू देविदास गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जि.प.प्रा.शाळेतील जिल्हा शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी राम प्रकाश गाटे( इयत्ता 8 वी) याचा आई वडिलांच्या उपस्थित  ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


     यावेळी मैत्री फाउंडेशनचे सदस्य आनंद रसाळ, माऊली देशमुख, अक्षय गाटे, प्रसाद गाटे, पंताजी गाटे, भैरव गाटे, वैभव गाटे, महेश गाटे, स्वप्निल हरेल, गोविंद आदलिंगे, धनाजी गाटे, किशोर जाधव, शहाजी गायकवाड जि.प.प्रा.शाळेतील मुख्याध्यापक श्री.मिरासे सर, शिक्षक श्री. सोनवणे सर, श्री.जोशी सर,  साठे मॅडम, सय्यद मॅडम, तुपेरे मॅडम, ग्रामसेवक जे.आय.तांबोळी साहेब, श्री.रवींद्र (दादा)अंबुरे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शाम गाटे, सोसायटी चेअरमन बळीराम सिरसट, श्री.आण्णाभाऊ रंगनाथ गाटे, माजी सैनिक सखाराम नामदेव गाटे, श्री.विठ्ठल गायकवाड, रोजगार सेवक राजीव आदलिंगे, श्री.समाधान पवार, कु.निखिल रसाळ  व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
मैत्री फाऊंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शालेय स्पर्धा परीक्षेचा निकाल :
प्रथम क्रमांक :- प्रांजली शाम सिरसट
द्वितीय क्रमांक :- गणेश राजेंद्र मंडलिक
तृतीय क्रमांक :- विद्या प्रकाश थोरात
शिष्यवृत्ती धारक विदयार्थी :- राम प्रकाश गाटे

कार्यक्रमाचे फोटो 👉👉  Photo Gallery